breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आरबीआयने पेटीएमला ठोठावला 1 कोटीचा दंड

मुंबई- देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा धक्का बसलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला 1 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आलाय. पेमेंट आणि सेटलमेंटच्या कलम 6 (2) चे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेचे प्रकरण पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करण्याशी संबंधित आहे. मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, अधिकृततेचे अंतिम प्रमाणपत्र जारी करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अर्जाची तपासणी केल्यावर पेटीएम पेमेंट्स बँकेने अशी माहिती दिली आहे, जी वास्तविक स्थिती दर्शवत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, अधिकृततेचे अंतिम प्रमाणपत्र जारी करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अर्जाची तपासणी करताना आरबीआयला आढळले की, पेटीएम पेमेंट्स बँकेने अशी माहिती दिली आहे, जी वास्तविक स्थिती दर्शवत नाही.
हे पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायद्याच्या कलम 26 (2) चे उल्लंघन करत असल्याने पेटीएम पेमेंट्स बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button