breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

आरबीआयने पीएमसी बँकेवरील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले

मुंबई | प्रतिनिधी 
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर घातलेले निर्बंध आरबीआयने ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवले आहेत. यापूर्वी हे निर्बंध १ जानेवारी २०२२ पर्यंत होते. मंगळवारी २८ डिसेंबरला आरबीआयने ही घोषणा केली.

२२ नोव्हेंबर २०२१ रोजी आरबीआयने एक मसुदा ठराव मांडला. त्यानुसार युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत पीएमसी बँक विलिन होणार आहे. त्यासाठी बँकेचे सदस्य, ठेवीदार आणि कर्जदारांकडून आरबीआयने सूचना व हरकती मागवल्या आहेत. त्यासाठी १० डिसेंबर २०२१ ही अंतिम तारीख दिली होती. मात्र यासाठी आणखी वेळ देण्याची गरज आहे. त्यावर मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. म्हणून रिझर्व्ह बँकेने घातलेले निर्बंध ३१ मार्च २०२२पर्यंत वाढवले आहेत. सप्टेंबर २०२१मध्ये रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. या बँकेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाली आहे. त्यामुळे ही बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन केली जाणार आहे. त्यानंतर बँकेचे ठेवीदार आणि कर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button