breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राऊतसाहेब, काळजी नको, जरुर सुधारणा करु, दिलीप वळसे पाटलांचा संजय राऊतांना शब्द

मुंबई |

भाजप नेत्यांविरुद्ध पुरावे देऊनही राज्याच्या गृहमंत्रालयाकडून पुरेशा तडफेने आणि तत्परतेने कारवाई होत नसल्याचा शिवसेना नेत्यांचा आरोप आहे. जर आपण तात्काळ पावलं उचलली नाही तर फाशीचा दोर आणखी आवळला जाईल, अशी भीतीही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत गृहमंत्र्यांच्या कामावर बोट ठेवलं. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संजय राऊतांसह तमाम सेना नेत्यांना शब्द दिलाय. “काळजीचं कारण नाही. सुधारणेला वाव असेल तर त्यात जरुर सुधारणा करु”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

भाजप नेत्यांविरोधात कारवाई करताना गृहमंत्र्यांची भूमिका सॉफ्ट असते, असा आक्षेपाचा सूर सेना नेत्यांचा होता. याच आक्षेपाला गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं. कोणतीही कारवाई करताना ती न्यायालयात टिकली पाहिजे, हाच निकष असतो, त्यात भूमिका सॉफ्ट आणि हार्ड हा विषय नसतो, असं गृहमंत्री म्हणाले. तसंच गृहखात्याच्या कामात जर काही सुधारणा गरजेच्या असतील तर त्या नक्की केल्या जातील, असा शब्द वळसे पाटलांनी संजय राऊतांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्याबाबतीत सॉफ्टपणे वागते का?, असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना वळसे-पाटील म्हणाले, “सॉफ्ट आणि हार्ड भूमिका म्हणजे काय असते, हेच मला कळत नाही. मी समोर येतील त्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतो. कोणतीही कारवाई करायची झाल्यास ती न्यायालयात टिकली पाहिजे. त्यामुळे सॉफ्ट असायचे कारणच काय? चूक असेल तिथे कारवाई होणारच”

संजय राऊत काय म्हणाले होते?

महाराष्ट्राच्या पोलिसांना व्यवस्थित काही सूचना मिळाल्या आणि मार्गदर्शन मिळालं तरी काम होऊ शकेल. गृह खात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. जर आपण आस्ते कदम भूमिका घ्याल तर आपल्याभोवतीचा दोर अधिक घट्ट होईल, अशी भीती व्यक्त करत गृहमंत्र्यांच्या कामाकडे राऊतांनी बोट दाखवलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गृहमंत्रालयाच्या कामाविषयी आपली चर्चा झाली. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा घुसताहेत, हे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या गृह खात्यावरचं आक्रमण आहे. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणा ज्यांच्या आखत्यारित आहे, त्यांनी यावर गांर्भीयाने लक्ष दिलं पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button