breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

  •  कोव्हिड सेल्फ टेस्ट किटचा वापर वाढला

मुंबईः मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली झपाट्याने वाढ हा चिंतेचा विषय आहे. करोना रुग्ण संख्यावाढीची धास्ती मुंबईकरांनीही घेतली आहे. मुंबईत कोविड होम टेस्ट किट आणि फोन करुन डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्याचबरोबर, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. (Mumbai Covid update) मागील काही आठवड्यांपासून डॉक्टरांचे सल्ले घेण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. असं असलं तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच तमी आहे, असं हिंदूजा रुग्णालयातील डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसंच, गेले काही महिने कोविड होम टेस्ट किटची मागणी खूपच कमी होती. मात्र, आता होम टेस्ट किटबाबत मोठ्याप्रमाणात चौकशी करत आहेत. तसंच, विक्रीतही वाढ झाली आहे, अशी माहिती केईएल रुग्णालयाबाहेरील मेडिकल विक्रेत्याने दिली आहे. सेल्फ टेस्ट किटच्या विक्रीचे प्रमाण ३० ते ४०% वाढले आहेत.

मुंबईत नागरिकांची आरटीपीसीआर व अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे. मुंबईत सापडलेल्या करोना रुग्णांपैकी ९४ टक्के रुग्ण हे लक्षणेविहरीत आहेत. ताप व सर्दी असलेल्या रुग्णांना आम्ही पॅरेसिटामॉल हेच औषध देतो. सध्या खूप कमी रुग्णांना कफाचा त्रास जाणवत आहे, अशी माहिती बॉम्बे रुग्णालयाचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. करोनाच्या काही रुग्णांना या दरम्यान घसा खवखवणे, घसा लाल होणे असा त्रास जाणवत आहे. तर, जे रुग्ण आता तपासणीसाठी येत आहेत त्यांना जानेवारीमध्ये करोना वा ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे. मंगळवारी पुन्हा करोना रुग्णसंख्येने उसळी घेतल्याने चिंता वाढली आहे. मुंबईमध्ये करोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असून १२००चा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत १,२४२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ९४ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. करोनामुळे ७४ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button