पिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून नात्यातील तरुणीवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी

नात्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर महिलेसोबत लग्न केले नाही. याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 फेब्रुवारी 2020 ते 16 जून 2021 या कालावधीत च-होली, भोसरी परिसरात घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने रविवारी (दि. 10) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नात्यातील आहेत. ते लहानपणापासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता तरुणाने तिला मारहाण करून तिच्यासोबत लग्न करायला नकार दिला. तरुणाने फिर्यादी तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button