पिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून नात्यातील तरुणीवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी

एका तरुणाने नात्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी 2022 आणि मार्च 2022 मध्ये दिघी परिसरात घडला.

पीडित तरुणीने याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी तरुणीच्या नात्यातील आहे. त्याने फिर्यादींसोबत प्रेमाच्या गोष्टी करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादी यांना मोशी मधील एका लॉजवर नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची आरोपीने फिर्यादी यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button