पिंपरी / चिंचवड

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 21 आठवड्याननंतर प्रकरणाला वाचा

पिंपरी l प्रतिनिधी

पाय, मांड्या व खुबा दुखत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता अल्पवयीन मुलगी तब्बल 21 आठवड्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर मुलीने तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. ही घटना चक्रपाणी वसाहत चौक आणि जाधववाडी येथील लॉजवर घडली.

अनिल पाटील (रा. दिघी. मूळ रा. कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने फिर्यादी यांच्या 13 वर्षीय मुलीला प्रेमाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत फोनवर आणि व्हाट्सअपवर चॅटिंग करून तिला मॅक्झीन चौक येथे बोलावले. मित्राशी भेटवण्याच्या बहाण्याने तिला जाधववाडी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

मागील काही दिवसांपूर्वी पीडित  मुलीचे पाय, मांड्या व खुबा दुखू लागला. त्यामुळे मुलीला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी मुलगी 21 आठवड्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीने तिच्यावर आरोपीने जाधववाडी येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला असल्याचे सांगितले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button