पिंपरी / चिंचवडपुणे

अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर उघडकीस आला बलात्काराचा प्रकार

पिंपरी | प्रतिनिधी

खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले. हा प्रकार 31 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर याप्रकरणी शनिवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपिल दिलीप कारामुंगे (वय 21, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. मूळ रा. सावरगाव, ता. लोहा, जि. नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत नाणेकरवाडी येथे घडला आहे. आरोपी कपिल याने पीडित 17 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर कपिल याने पीडित मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button