ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्यवसाय करू देण्यासाठी तरुणाकडे मागितली 50 हजारांची खंडणी, 11 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पिंपरी चिंचवड | तरुणाला व्यवसाय करू देण्यासाठी तिघांनी मिळून तरुणाकडे 50 हजारांची खंडणी मागितली. ती न दिल्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला कोयते व काठ्या घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकरा जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 15) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा, डांगे चौक रोड, थेरगाव येथे घडला.राम पाटील, कृष्णा पाटील, लहू सुतार (सर्व रा. रहाटणी) आणि अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतीक किरण पवार (वय 22, रा. थेरगाव गावठाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्यवसाय करू देण्यासाठी आरोपी राम, कृष्णा आणि लहू या तिघांनी फिर्यादीकडे 50 हजार रुपये खंडणी मागितली. फिर्यादीने आरोपींना खंडणी दिली नाही. त्यावरून आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या अन्य सात ते आठ साथीदारांना जमवून कोयते व काठ्या घेऊन फिर्यादीचा पाठलाग केला. परिसरात दहशत निर्माण केली. राम आणि कृष्णा या दोघांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. मात्र फिर्यादी यांनी ते वार चुकवले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button