breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रणजीत सिंह हत्या प्रकरण: गुरमीत राम रहीमला जन्मठेप

चंदीगड – रणजीत सिंह हत्या प्रकरणात  पंचकुलामधील  विशेष सीबीआय कोर्टाने  सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये डेरा सच्चा सौदाचे गुरमीत राम रहीम  आणि अन्य चौघांचा समावेश आहे. राम रहीम यांना ३१ लाखाचा दंड ठोठावला आहे तर अन्य आरोपींना ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. रणजीत सिंह राम रहीम यांचे माजी मॅनेजर होते. २००२ मध्ये त्यांची हत्या झाली होती.

कृष्ण लाल, जसबीप सिंह, अवतार सिंह आणि साबदील अशी शिक्षा झालेल्या चार आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील सहाव्या आरोपीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. आठ ऑक्टोबरला रणजीत सिंह हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचे गुरमीत राम रहीम आणि अन्य चौघांना दोषी ठरवण्यात आलं होतं.

२०१७ मध्ये बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यापासून राम रहीम रोहतक जिल्ह्याच्या सुनारीया जेलमध्ये तुरुंगवास भोगत आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन राम रहीम सुनावणीला हजर होता. अन्य आरोपी कोर्टात हजर होते.शिक्षा सुनावण्याआधी हरयाणा पंचकुलामध्ये निर्बंध आदेश लागू करुन कलम १४४ लावण्यात आले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये राम रहीम बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मोठा हिंसाचार झाला होता. ३६ जणांचा मृत्यू झाला होता. हीच बाब ध्यानात घेऊन कलम १४४ लागू करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button