पिंपरी / चिंचवड

‘रामनवमी माझ्या नावाने साजरी करायची, बॅनरवर माझे नाव टाकायचे’ म्हणत एकास मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

रामनवमी माझ्या नावाने साजरी करायची. बॅनरवर माझे नाव टाकायचे. इथला बाप एकच आहे तो मी आहे, अशी दमदाटी करत आठ जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 28) मध्यरात्री सव्वा बारा वाजता संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली.

दिनेश पाटील, अभिनव पाटील, निलेश जैसवाल (सर्व रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) आणि अन्य चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश माणिक आंधाळे (वय 28, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी झोपले असताना आरोपी घरी आले. आरोपी दिनेश पाटील याने शिवीगाळ करत ‘रामनवमी आपल्या एरियामध्ये साजरी करायची नाही. केली तर माझ्या नावाने साजरी करायची. बॅनरवर माझे नाव टाकायचे. इथला बाप एकच आहे तो मी आहे. तू मी ठेवलेल्या कोणत्याही कार्यक्रमाला येत नाही. तुला लय मस्ती आहे’ अशी दमदाटी करत फिर्यादी यांना कानाखाली मारली. त्यावेळी आरोपी अभिनव आणि निलेश यांनी फिर्यादी यांना आणि घराच्या दरवाजावर लाथा मारल्या. फिर्यादी तिथून पळून घरात जात असताना आरोपी दिनेश म्हणाला की, ‘तू जर पोलिसात गेलास तर तुझा मर्डर करील’ त्यावेळी अन्य चार ते पाच जणांनी फिर्यादी यांना जोरजोरात शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

—-

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button