क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

राजा करण, सेल, हर अकॅडमी अंतिम आठ मध्ये

पिंपरी चिंचवड | एसएनबीपी अकॅडमी, नवल टाटा, नागपूर अकॅडमी, हर अकॅडमी, राजा करण अकॅडमी, सेल हॉकी संघांनी आपआपल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून 5 व्या एसएनबीपी अखिल भारतीय 16 वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धेत बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली.म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जी गटाच्या सामन्यात प्रजापती कृष्ण कुमार, अरूण पाल, झैद मोहम्मद खान, रोहन सिंग यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर एसएनबीपी अकॅडमी संघाने कोलकाता वॉरियर्स संघाचा 5-0 गोलने पराभव करून बाद फरीत प्रवेश केला.एफ गटामध्ये पश्चिम बंगालच्या बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ संघाने हॉकी नाशिक संघाला 5-0 गोलने नमविले. विजयी संघाकडून गौरव संगेलेने 10 व्या व 20 व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळून दिली. त्यांच्या गणेश चौधरीने 25 व्या, यादनेश पगारेने 51 व्या व निनाद गाडेने 54 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. हॉकी नाशिक संघाचे खेळाडू एकही गोल करू शकले नाही.

सोनीपतच्या हर हॉकी अकॅडमीने ए गटात मालवा हॉकी अकॅडमीला 12-0 गोलने पराभूत करून बाद फेरीत प्रवेश केला. हर अकॅडमीकडून साहिल रौल 2 गोल (6 व 48 मि.), मन्नू मलिक 1 गोल (4 मि.), सुखविंदर 3 गोल (36, 43, 37 मि.), नितीन 1 गोल (39 मि.), विनय 2 गोल (42 व 60 मि.), नवीन 1 गोल (44 मि.), जीतपाल 1 गोल (45 मि.) व नितिन 1 गोल (55 मि.) यांनी आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मालवा हॉकी अकॅडमीकडून एकही गोल नोंदविला गेला नाही.सी गटात झालेल्या चुरशीच्या लढतीत अमरजीत सिंगने 5 व्या मिनिटाला नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर नागपूर हॉकी अकॅडमी संघाने अमृतसरच्या एसजीपीसी संघाला 1-0 गोलने पराभव करून बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली.

गुरूवारी उशीरा झालेल्या सामन्यांमध्ये एच गटात कर्नालच्या राजा करण अकॅडमी संघाने उत्तर प्रदेशच्या अनवर हॉकी सोसायटी संघाचा 2-1 गोलने तर सेल हॉकी अकॅडमीने भिलवाडा हॉकी अकॅडमीचा 3-0 गोलने पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.उद्या शनिवारी बाद फेरीत हर हॉकी अकॅडमी, सोनीपत विरूध्द राजा करण अकॅडमी, कर्नाल (सकाळी 8.30 वा.) ; नवल टाटा हॉकी अकॅडमी, जमशेदपूर विरूध्द एसएनबीपी अकॅडमी, पुणे (10.30 वा.); सेल हॉकी अकॅडमी, ओडिसा विरूध्द आर. के. रॉय अकॅडमी, पटणा (दुपारी 1 वाजता); आणि रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर, झारखंड विरूध्द नागपूर हॉकी अकॅडमी (दु. 3 वाजता) यांच्यात चुरशीच्या लढती होतील.

निकाल –

जी गट : एसएनबीपी अकॅडमी : 5 गोल (अरूण पाल 9 मि.,-1 गो., प्रजापती कृष्ण कुमार 21 मि. -1 गो., झैद मोहम्मद खान 22 व 23 मि.-2 गो., रोहन सिंग 26 मि.- 1 गो.) वि. वि. कोलकाता वॉरियर्स : शून्य गोल)
एफ गट : बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ, पश्चिम बंगाल : 5 गोल (गौरव संगेले 10 व 20 मि. -2 गोल, गणेश चौधरी 25 मि.-1 गो., यादनेश पगारे 51 मि.- 1 गो., निनाद गाडे 54 मि.- 1 गोल) वि. वि. हॉकी नाशिक : शून्य गोल;
ए गट : हर हॉकी अकॅडमी, सोनीपत : 12 गोल (साहिल रौल 6 व 48 मि.-2 गो., मन्नू मलिक 4 मि. -1 गो., सुखविंदर 36, 43, 37 मि. -3 गो., नितीन 39 मि. -1 गो., विनय 42 व 60 मि. -2 गो., नवीन 44 मि. -1 गो., जीतपाल 45 मि. – 1 गो., नितिन 55 मि. -1 गो.) वि. वि. मालवा हॉकी अकॅडमी, राजस्थान : शून्य गोल.
ब गट : नवल टाटा हॉकी अकॅडमी : 6 गोल (अभिषेक टिक्का 5 व 7 मि.- 2 गो.,सत्यम पांडे 8, 10 व 48 मि.- 3 गो., जोलेन टोपनो 12 व्या मि.- 1 गो) वि. वि. मदर टेरेसा हायस्कूल, तेलंगणा : शून्य गोल.
इ गट : नागपूर हॉकी अकॅडमी : 1 गोल (अमरजीत सिंग 5 वा मि.-1 गो.) वि. वि. एसजीपीसी, अमृतसर : शून्य गोल.
गुरूवारी उशिरा झालेले सामने –

सी गट : सेल हॉकी अकॅडमी : 3 गोल (निशाद सोनू 17 मि. -1 गो., राबी बाडा 25 मि. – 1 गो., अनमोल इक्का ज्यु. 45 मि. -1 गो.) वि. वि. भिलवाडा हॉकी अकॅडमी : शून्य गोल.
एच गट : राजा करण अकडमी, कर्नाल : 2 गोल (पंकज 47 व 48 मि. – 2 गो.) वि. वि. अनवर हॉकी सोसायटी : 1 गोल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button