ताज्या घडामोडीपुणे

राज ठाकरेंचा सिझनेबल कार्यक्रम; गुलाबराव पाटलांची टीका

पुणे  |’मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील त्यांच्या जाहीर भाषणात राज्यातील सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यावर चौफेर फटकेबाजी करत हिंदुत्वाच्या मुद्द्याला राज ठाकरे यांनी हात घातला. त्याचबरोबर त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा त्याच्यापेक्षा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा मशिदीसमोर लावण्यात येईल, असा इशारा देखील दिला. यावरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राज ठकरेंना टीकेचं लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीही राज ठाकरें वर सडकून टीका केली आहे.

ज्याप्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. त्याप्रमाणे राज ठाकरे हे त्या तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. राज ठाकरे यांनी ‘मनसे’ स्थापन करण्यापूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांना कल्याणमध्ये मारहाण केली. त्यानंतर ‘मनसे’ स्थापन करताना हम सब भाई है, असे म्हणाले. पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही. मध्येच त्यांना साक्षात्कार झाला आणि नरेंद्र मोदींच्या गुजरातला गेले. त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर टीका केली आणि त्यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला. त्यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. आता त्यांना शरद पवार वाईट झालेत, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांचा हा सगळा सिझनेबल कार्यक्रम आहे. कोणत्याच ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, तसेच हिवाळ्यात थंडी वाजत नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही. मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तसेच राज ठाकरे यांनी मी लहानपणापासून ओळखतो. मी शिवसैनिक आहे. ते आमच्या जिल्ह्यात येत होते. चंचल माणूस, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. यावरून हनुमान चालीसा लावायला कोणाची मनाई आहे. भोंगा उतरवा म्हणणारे पहिले बाळासाहेब ठाकरे होते. त्या काळात कोणाचीही हिंमत होत नव्हती. बोलणं सोप्प आहे, करणं कठिण आहे. त्यांना जितका मी ओळखतो तितके तुम्ही ओळखत नाही, असे ते पुढी म्हणाले. भेट घेतली पाहिजे. त्यांच्या नावात ठाकरे आहे. राज ठाकरे हे काहीतरी आरोप करायचे म्हणून करतात. ज्या माणसाला स्वतःचा एक नगरसेवक राखता येत नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं, अशी टीकाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button