ताज्या घडामोडी

राज ठाकरेंची सभा; परवानगी मिळण्यापूर्वीच मैदानात तयारी सुरू

औरंगाबाद| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांची १ मे रोजी औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला अजूनही परवानगी मिळालेली नसली तरी ती मिळेल असे गृहित धरत मैदानावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मनसेने सभेसाठी १५ हजार खुर्च्या मागवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कशी असणार व्यवस्था?

राज ठाकरे यांच्या सभेसाठी एकूण १५ हजार खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. तर आजूबाजूला असलेल्या गॅलरीमध्ये आणखी ५ हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे. तर मुख्य व्यासपीठ हे ३० बाय ६० असे असणार आहे. तर स्टेजच्या समोर ५० फुटांचा ‘डी स्पेस’ असणार आहे. तसेच शेवटपर्यंत बसलेल्या लोकांना सभा पाहता यावी यासाठी चार एलडी वॉल देखील लावण्यात येणार आहे.

संध्याकाळपर्यंत मिळणार राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी

दरम्यान, राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला आज संध्याकाळपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही परवानगी देत असताना त्यांना काही अटींचे पालन करावे लागू शकते, असेही म्हटले जात आहे.

राज ठाकरे यांना आपल्या सभेदरम्यान ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. त्याच प्रमाणे १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश आणि जातीवरून वक्तव्ये टाळावी लागणार आहेत. तसेच व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याचीही दक्षता त्यांना घ्यावी लागणार आहे. सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन केले जाणार नाही याची काळजीही घ्यावी लागणार नाही. वाहन पार्किंगचे नियम पाळावे. सभा सुरू होण्यापूर्वी आणि सभेनंतर वाहन रॅली किंवा मिरवणूकही काढता येणार नाही.

या बरोबरच सभेला येणार्‍या कार्यकर्त्यांनी सामाजिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असून कार्यकर्त्यांनी त्या प्रकारच्या घोषणा देऊ नयेत अशीटी अट घालण्यात आली आहे. लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता पक्षाला घ्यावी लागणार आहे. तसेच सभेला येणाऱ्या सर्वांनाच वाहन पार्किंगचे नियम पाळावे लागणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button