ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा लाखांची, मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा

 औरंगाबाद | मनसेच्या स्थापनेपासूनच हिंदुत्व आमचा भाग होता. पूर्वीही होता, आताही आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुद्दे काढणारे आम्ही नाहीत. मनसे प्रमुख राज ठाकरे  यांच्या सभेसाठी तयारी पूर्ण झालेली आहे. पोलिस परवानगी घेतली जाणार आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादला सभा घोषित केल्यापासून, सभा ऐकण्यासाठी लोक आतूर आहेत. या सभेसाठी एक लाखांपेक्षा अधिक नागरिक जमतील, असा विश्वास मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यासह पत्रकार परिषदेत प्रवक्ते प्रकाश महाजन, उपाध्यक्ष सतनाम गुलाटी, जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर, राजू जावळीकर, आशिष सुरडकर, संकेत शेटे, वैभव मिटकर, गजन गोडापाटील, बिपीन नाईक, आकाश खोतकर, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दिलीप धोत्रे म्हणाले, ‘बुधवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या बैठका पार पडल्या. राज ठाकरे सभेत काय बोलणार याची नागरिकांसोबतच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे. अनेक संघटनांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे.’

विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक राज ठाकरे यांना ऐकायला येणार असल्याचा दावाही दिलीप धोत्रे यांनी केला. सभेसाठी तयारी पुर्ण झालेली आहे. पोलिस परवानगीसाठी सर्व नियमांची पुर्तता करून अर्ज टाकण्यात येणार आहे. पोलिस परवानगीची काहीही अडचण राहणार नाही. राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर होईलच. दुसऱ्या ठिकाणी सभा घेण्याबाबत आम्हाला संकेत देण्यात येत आहे. मात्र काहीही झाले तरी, गुन्हे अंगावर घेऊ पण सभा सांस्कृतीक मंडळावरच करू अशीही माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली.

‘मनसे कोणाच्या दावणीला बांधलेले नाही’

राज ठाकरे यांची सभा होऊ नये. यासाठी प्रयत्न केला जात आहे. कार्टूनचे बॅनर लावण्यात येत असल्याबाबत विचारले असता दिलीप धोत्रे म्हणाले, ‘सभा उधळून लावण्याचा कोणाचाही दम नाही. तसेच शिवसेनेबाबत त्यांनी टिका करताना, शिवसेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेले पक्ष आहे. मनसे हा कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेला पक्ष नाही. मनसे स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button