breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, भाजप खासदाराचा इशारा

मुंबई |

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून अनेक वेळा उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. त्यांनी अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतरच अयोध्येत पाऊल ठेवावं, जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी उघड धमकीच ब्रिजभूषण यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाची शाल पांघरल्यानंतर त्यांनी ३ जाहीर सभा घेतल्या. पाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत त्यांनी रणशिंग फुकलं. पुढे ठाण्यातल्या उत्तर सभेत आणि औरंगाबादेतील सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत हिंदुत्ववादाची भूमिकेला आणखी धार लावली. तत्पूर्वी पुण्यातील पत्रकार परिषेद त्यांनी येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. आपल्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. त्यांच्या याच दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध केला आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे, ” “राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी सल्ला देऊ शकत नाही, पण लोकांच्या भावना लक्षात घेता मी त्यांना विनंती केली आहे की, जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका”

राज ठाकरे योगींना भेटणार?

मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा, हिंदुत्व अशा मुद्द्यांवरुन राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून आणि उत्तर सभेतून याच मुद्द्यांवर भर दिला. तसंच मशिदीवरील भोंगे हटविण्यासंबंधी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला. राज ठाकरेंच्या सभेचा परिणाम उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला. तिकडे प्रार्थनास्थळावरील भोंगे विशेषत: मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात सरकारने कडक पावलं उचलली. एकंदरित राज ठाकरेंच्या अल्टिमेटमचा परिणाम शेकडो किलोमीटर दूर असलेल्या उत्तर प्रदेशात झाला. याचमुळे राज ठाकरे योगी सरकारवर प्रचंड खूश आहेत. गुडी पाडवा मेळाव्यातही राज ठाकरेंनी योगी सरकारचं कौतुक केलं होतं. आता मशिदीवरील भोंगे हटविल्यानंतर योगी सरकारवर राज ठाकरे भलतेच खूश झाले आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यात राज ठाकरे योगींची भेट घेण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button