breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

Raj Thackeray : माहिमचा अनधिकृत दर्गा हटवा..अन्यथा ‘शेजारी गणपती मंदिर उभारणार!

गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी सरकारला आणि प्रशासनाला दिला अल्टिमेटम

मुंबईः गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी सरकारला आणि प्रशासनाला एक अल्टिमेटम दिला आहे. मुंबईच्या समुद्रात होत असलेल्या अतिक्रमणाचा एक व्हीडिओ राज ठाकरेंनी यावेळी दाखवला.
माहीमच्या मकदूम बाबाच्या दर्ग्यासमोर अनधिकृतरित्या झेंडे लावून अतिक्रमण होत आहे. ते थांबवलं नाही तर आम्हीही तेथे मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला.
काय म्हणाले राज ठाकरे?
मुंबईच्या समुद्रात अनधिकृतरित्या झेंडे लावले जात आहेत. माहीम पोलिस स्टेशन जवळ आहे पण लक्ष नाही. महानगरपालिकेचे लोक तिथे जातात, परंतु बघितलं जात नाही. समुद्रात नवीन हाजी अली करणार असाल तर याद राखा. प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांना मी आजच सांगतो महिन्याभराच्या आत कारवाई झाली नाही, ते तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपती मंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही. मग काय व्हायचंय ते होऊन जावू दे. सगळ्यांकडू दुर्लक्ष करीत असाल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. तुम्हाला सांगतो, हे राज्य माझ्या हातात आलं तर सुतासारखं सरळ करेन, असं म्हणून त्यांनी इशारा दिला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे..

नारायण राणे शिवसेनेबाहेर गेलेच नसते…

शिवसेनाप्रमुखपद एकाला झेपलं नाही दुसऱ्याला झेपेल की नाही, माहिती नाही.

त्यांच्या बाजूच्या लोकांना आत्ताच सांगतो. माझं बोलणं झाल्यावर तोंड उचकटू नका.

धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांनाच झेपू शकतो

नारायण राणे बाहेर गेलेच नसते. मी फोन करुन विचारलं हे काय करताय?

जावू नका. ते म्हणाले बोला बाळासाहेबांशी.

मी बोललो. बाळासाहेब म्हणाले घरी घेऊन ये.

नंतर बाळासाहेब बोलले त्यांना नको बोलावू. मागे कोणतरी बोलत होतं हे मला ऐकू येत होतं.

अशा प्रकारे लोकांना बाहेर काढणं चालू होतं

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button