ताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरे झाले आजोबा

मुंबई| दोन दिवसांपूर्वी गुढीपाडव्या निमित्ताने झालेल्या मेळाव्यातील भाषणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा राज ठाकरे चर्चेत आले आहेत पण यावेळचे कारण राजकीय नाही तर कौटुंबिक आहे. राज ठाकरे आजोबा झाले आहेत. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे यांना मंगळवारी पुत्ररत्न झाला.

पक्षाचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरून ही गोड बातमी सर्वांना दिली. आमचे साहेब आजोबा झाले, अशी पोस्ट त्यांनी केली. त्याच बरोबर युवराजांचे आगमन असे सांगत त्यांनी राज ठाकरे यांना नातू झाल्याचे म्हटले. सचिन मोरे यांनी अमित ठाकरे यांचे देखील अभिनंदन केले आहे. मंगळवारी सकाळी मिताली ठाकरे यांनी बाळाला जन्म दिला. मुलाचा जन्म झाल्याचे वृत्त कळताच राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे ब्रीज कँन्डी रुग्णालयाकडे रवाना झाले. अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी झाला होता. हा विवाह सोहळा परळ येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये पार पाडला होता. या सोहळ्यास राज्यातील राजकीय नेत्यांसह, चित्रपट आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अमित आणि मिताली यांचा साखरपुडा डिसेंबर २०१८ मध्ये पार पडला होता. मिताली या फॅशन डिझायनल आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून शिक्षण घेतले. राज ठाकरे यांची कन्य उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री असून दोघींनी मिळून काही वर्षांपूर्वी ‘द रॅक’ हा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button