breaking-newsTOP NewsUncategorizedपश्चिम महाराष्ट्र

मिरजेतील फार्म हाऊसवर छापा; लाखो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

सांगली : पुणे सीमा शुल्क विभागाकडून मिरज तालुक्यातल्या वड्डी याठिकाणी छापा टाकून लाखो रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. एका फार्म हाऊसवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये अंमली पदार्थ कोणता? नेमका साठा किती आणि काय कारवाई करण्यात आली आहे, याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे.

मिरज पूर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून अमली पदार्थाचा साठा हस्तगत केल्याची समोर येत आहे. मात्र या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मिरजेतील एका ग्रुपच्या फार्म हाऊसवर सांगली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने पुणे विभागीय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा टाकून अमली पदार्थांचा साठा जप्त केला. त्यानंतर उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

मात्र हा अमली पदार्थ कोणता? साठा नेमका किती ? तो कोणाचा याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान थेट पुणे येथील केंद्रीय पथकाने अचानक छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याने याबाबत शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button