‘भारताने वर्ल्डकप जिंकला असता पण पनौती..’; राहुल गांधींची नाव न घेता मोदींवर टीका

Rahul Gandhi : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, आपली मुलं चांगल्या पद्धतीने वर्ल्ड कप जिंकले असते. पण तिथं पणवतीने हरवून टाकलं (पणवतीमुळे आपण हरलो) टीव्हीवाले हे नाही सांगणार की (कोण पणवती), पण जनतेला माहितेय. ते नुसता लोकांना भुलवतात. कधी इकडे नेतात तर कधी तिकडे नेतात. त्यांच्या धोरणाचा फायदा देशातल्या काही उद्योगपतींनाच झाला आहे. गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीत मोदींनी देशातल्या दहा ते पंधरा उद्योगपतींचे १४ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं. आता त्या उद्योगपतींमध्ये कोण गरीब होतं? कोण मागासलेलं होतं?
हेही वाचा – ‘मराठा आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाच नाही’; ठाकरे गटातील नेत्याची टीका
पनौती 😉 pic.twitter.com/kVTgt0ZCTs
— Congress (@INCIndia) November 21, 2023
मी संसदेत बोलताना जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारने मागासवर्गियांसाठी काम करण्याची मागणी केली. देशातल्या ५० टक्क्यांहून जास्त लोक हे मागासलेले आहेत. त्यांची जनणा झाली पाहिजे. नरेंद्र मोदी हे जिकडे जातात तिकडे सांगतात की ते ओबीसी आहेत म्हणून. मग जातीय जनगणना करायला काय अडचण आहे? असा सवालही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला.