breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

राहुल द्रविड भारताचा नवा मुख्य प्रशिक्षक

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरा बीसीसीआयने त्याच्या या नियुक्तीची घोषणा केली. विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाल टी-२० वर्ल्डकपनंतर संपणार आहे. त्यामुळे द्रविड वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या सामन्यांच्या मालिकेत संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहे. १० कोटींच्या वेतनावर त्याची नियुक्ती झाल्याचे समजते.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने बीसीसीआयकडे अर्ज केला होता. त्यामुळे या पदासाठी इतरांनी केलेल्या अर्जांकडे पाहण्याची वेळच बीसीसीआयवर आली नाही. प्रशिक्षक निवडीच्या बुधवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत सदस्यांनी एकमताने राहुल द्रविडच्या नावाला पसंती दिली. सुलक्षणा नायक आणि आर. पी. सिंह यांचाही त्यात समावेश होता. राहुल द्रविडची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी २०२३ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या तो बेंगरूळुत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम करत आहे. अनेक ज्युनियर खेळाडू तयार करण्याचे काम त्याने केले आहे. त्यामुळे आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत तो भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक असणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button