breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रॅडिकलायझेशन आणि पिंपरी-चिंचवड : रोहित आठवले

पिंपरी : शहर आयुक्तालयात महिन्याभरापूर्वी झालेल्या सिक्युरिटी रिव्ह्यू मीटिंगमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरात रॅडिकलायझेशन वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले होते. त्यानंतर एटीएसने अवघ्या काही दिवसात दापोडीत कारवाई करून संशयिताला अटक केली आहे.

एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलने दहशतवाद आणि नक्षलवादाशी संबंधाच्या संशयावरून किंवा थेट सहभाग उघड झाल्याने काही जणांना यापूर्वी पिंपरी-चिंचवड मधून अटक केली आहे. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर पण आयुक्तालयात चार वर्षानंतरही “#एटीसी”चे काम सुरू झालेले नाही तर पुण्यातील “पीएटीसी”चे काम थंडावले आहे. पूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बोलाविले आहे असे म्हणले तरी अनेकांना भीती असायची.. पण सध्या गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घर ते ऑफिस असा स्वतःचा प्रवास करण्यासाठी गुगल मॅप ची गरज भासत आहे.

मात्र, सिक्युरिटी रिव्ह्यू मीटिंगमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरात रॅडिकलायझेशन वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेल्यानंतर स्थानिक पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी या बाबत #गंभीर असून, आवश्यक कार्यवाही त्यांनी महिन्यापूर्वीच हाती घेतली होती. राज्य आणि केंद्र सरकारला याबाबत याबाबत कळविण्यात आले होते. त्यामुळे शहरात तपास यंत्रणांची अन्य कारवाईही येत्या काळात दिसून येऊ शकते.

पिंपरी चिंचवड चे सध्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांना ही बदलण्यात आले आहे. त्यामुळे #मरगळलेल्या गुन्हे शाखेला आयुक्त आगामी काळात बळकटी देतील अशी आशा आहे. त्याचबरोबर शहराची जाण असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणून शहर शांत राहील असे नियोजन येत्या काळात पाहायला मिळू शकते.

दहशतवादी कारवाया आणि पुणे जिल्हा असा विचार करताना एटीएसच्या (राज्य दहशतवाद विरोधी पथक) धर्तीवर पुण्यात स्पेशल ऑपरेशन विंग सुरू झाले होते. कालांतराने राज्यभर हे विंग स्थानिक पोलिसांच्या अखत्यारीत सुरू करण्यासाठी त्याची पूनर्ररचना करताना त्याचे नामांतर एटीसी (दहशतवाद विरोधी सेल) तर पुण्यात पीएटीसी असे झाले. या नामांतरानंतर राज्यात सर्वत्र एटीसी गुन्हेशाखेच्या अंतर्गत काम करत आहे. पण पुण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या अती उच्चपस्थ अधिकाऱ्यांनी गुन्हेशाखेच्या अंतर्गत असलेले पीएटीसी हे “स्पेशल ब्रांच”ला जोडले आणि त्याचे काम थंडावले असे अनेक अधिकारी सांगतात.

जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्ब स्फोट, हैदराबाद बॉम्ब स्फोट, गुजरात बॉम्ब स्फोट, मुंबई साखळी स्फोटातील आरोपींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पिंपरी-चिंचवडचा यापूर्वी उघड झालेला संबंध विसरून चालणार नाही. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुणे “एटीएस”ला रिक्त जागेवर अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे एटीएसला मदत होईल या स्वरूपाने “एटीसी”ने काम करण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button