पिंपरी / चिंचवड

ओटास्कीम येथे टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करत एकास लुटले

पिंपरी l प्रतिनिधी

बारा ते तेरा जणांच्या टोळक्याने ओटास्किम येथे कोयता, तलवार, दांडके, दगड घेऊन राडा घातला. काही वाहनांची तोडफोड करून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. टोळक्याला समजावून सांगणा-या एकाला कोयत्याचा धाक दाखवून टोळक्याने लुटले. ही घटना रविवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.

राधाकिशन अच्युत खरात (वय 31, रा. ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर, जाकीर उर्फ डॅनी पठाण, विशाल उर्फ ठेंगळ्या खरात, विशाल उर्फ विठ्ठल पायाळ, सचिन उर्फ गुलाब जाधव, धनंजय उर्फ बबलू रणदिवे, सोन्या उर्फ भाव्या किशोर बाविस्कर, तात्याचा मुलगा बज्या, हृतिक सकट, करण डोंगरे (सर्व रा. ओटास्किम, निगडी) आणि दोन ते तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून हातात लोखंडी कोयता, तलवार, लाकडी दांडके, दगड घेऊन फिर्यादी यांच्या परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादी आणि अन्य लोकांच्या वाहनांची तोडफोड करून अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. याबाबत फिर्यादी आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवून पाच हजार 600 रुपये काढून घेतले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button