पिंपरी / चिंचवड

वीज कनेक्शन तोडल्याने महावितरणच्या कार्यालयात राडा

पिंपरी l प्रतिनिधी

वीजबील थकविल्याने महावितरणने वीजेचे कनेक्शन तोडले. याचा राग आल्याने एकाने महावितरणच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. महावितरणच्या कर्मऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी महावितरणच्या दापोडी कार्यालयात घडली.

आदर्श शिंदे (पूर्ण नाव माहित नाही. रा. काटे रेसिडेन्सी, फ्लॅट बी 112 दापोडी) याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महावितरणच्या अधिकारी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे याच्या घराचे बीज बिल भरण्याचे थकले आहे. वीजबील भरत नसल्याने महावितरणकडून शिंदे याच्या घराचे वीज कनेक्शन तोडले. याचा राग आल्याने शिंदे याने महावितरणच्या दापोडी कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. ‘तुम्हाला लय माज आला आहे का, तुम्ही आमच्या बिल्डिंगकडे पुन्हा आले तर तुमचे तंगडे तोडतो’, अशी धमकी देत त्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.

आरोपी जोरजोराने भांडणे करत असल्याने फिर्यादी यांनी आरोपीच्या आई-वडीलांना फोन करून बोलावून घेतले. आई-वडील आल्यानंतर आरोपी जास्त चिडला. त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच ‘तुम्ही आमच्या बिल्डिंगकडे या तुमच्या अंगावर हिजडे सोडतो’, असे बोलून फिर्यादी यांच्या हातातील वीजबील वसुलीची यादी आणि मोबाईल ओढून तो फेकून दिला. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button