breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मदर तेरेसा यांच्या ट्रस्टला धक्का; परकीय मदत निधी घेण्यावर बंदी

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेला मानवतावादी कार्यासाठी परदेशी देणग्या स्वीकारण्यास बंदी घातली आहे. परदेशी योगदान नियमन कायद्याअंतर्गत मदर तेरेसा चारीटेबल ट्रस्टच्या परवाना नूतनीकरणाला केंद्र सरकारने सोमवारी नकार दिला. त्यामुळे या ट्रस्टच्या उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत आटला. परवाना नूतणीकरणास नकार का दिला त्याचे कारण मात्र सरकारने दिलेले नाही.

धर्मदाय संस्थांना परदेशी देणग्या स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारच्या परदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांना परवाना दिला जातो. त्याचे नूतनीकरण करावे लागते. मदर तेरेसा ट्रस्टने या परवाना नूतनीकरणासाठी केंद्र सरकारला विनंती केली होती. परंतु केंद्राने परवान्याचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. त्याचे कारणही दिलेले नाही. त्यामुळे ट्रस्टला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत बंद झाला आहे. ख्रिसमसमध्ये ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतात २ टक्के ख्रिश्चन आहेत. अलीकडे चर्चवर हल्ले होत आहेत. ख्रिश्चन साहित्य जाळले जात आहे. शाळा आणि उपासकांवर हल्ले होत आहेत. धर्मसंसदेत वादग्रस्त विधाने केली जात आहेत. या सर्व प्रकारामुळे ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button