breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारतासोबत स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानची जे-१०सी लढाऊ विमानांची खरेदी; पाक खासदाराकडून मात्र राफेलचं कौतुक

नवी दिल्ली |

भारताच्या राफेलशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून जे-१०सी लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. पाकिस्तान सरकारचे मंत्री शेख रशीद यांनी याबाबत माहिती देताना सांगितले होते की, पुढील वर्षी मार्चपर्यंत २५ चिनी लढाऊ विमाने पाकिस्तानी ताफ्यात सामील होतील. मात्र, पाकिस्तानी खासदाराने राफेल विमान हे जे-१० सी पेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, जे-१० हे मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट आहे. हे चेंगडू एअरक्राफ्ट कंपनीने विकसित केले आहे. नाटोने त्याला फायरबर्ड असे नाव दिले. जे-१० पहिल्यांदा १९९८ मध्ये सिंगल सीटर जेटने उडवण्यात आले होते. जे-१०सी ही जे-१० ची नवीन आवृत्ती आहे आणि २०१८ मध्ये चिनी सैन्यात समाविष्ट करण्यात आली होती.

तज्ञांच्या मते, जे-१० हे सिंगल इंजिन आणि हलके लढाऊ विमान आहे, जे सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्यास सक्षम आहे. या विमानाला एक मोठा डेल्टा विंग आहे आणि अतिरिक्त स्थिरता किंवा नियंत्रण मिळवण्यासाठी डिझाइन केलेले दोन कॅनर्ड आहेत. हे कॉकपिटच्या मागे असतात. जे-१० रशियन बनावटीच्या मिग-२९ आणि अमेरिकेच्या एफ -१६ प्रमाणेच पेलोड वाहून नेतात. चीनने बनवलेले तैहांग इंजिन जे-१०सी मध्ये बसवण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानी खासदार डॉ.अफनान उल्लाह खान यांनी जे-१०सी खरेदीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. फ्रेंच डसॉल्ट अॅव्हिएशनने बनवलेल्या राफेल विमानांच्या बरोबरीने ते टिकू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी खासदार डॉ. अफनान उल्लाह खान यांनी ट्विट करत मला जे-१०सी खरेदी करण्यामागील तर्क समजत नाही. आमच्याकडे आधीच फायटर एफ-१६ आहे जे सारखेच आहे. जे-१०सी राफेल इतकं चांगलं आहे असं मला वाटत नाही, असे म्हटले आहे. भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे.

दरम्यान, राफेल लढाऊ विमाने सुरू होताच ते अल्पावधीतच मोठी उंची गाठू शकतात. राफेलचा वेग ३०० मीटर प्रति सेकंद आहे, म्हणजेच राफेल एका मिनिटात १८ हजार मीटर उंचीवर जाऊ शकते. राफेल लढाऊ विमानाची लढाऊ त्रिज्या ३७०० किमी आहे, तसेच ते दोन इंजिनांचे विमान आहे. याशिवाय यामध्ये तीन प्रकारची क्षेपणास्त्रेही बसवता येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button