ताज्या घडामोडीपुणे

मास्क न वापरणा-या 9 हजार 270 जणांवर दंडात्मक कारवाई

पुणे | कोविडपासून बचावासाठी मुखपट्टी (मास्क) न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण 9 हजार 270 कारवाईत 45 लाख 36 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस विभागामार्फत मुखपट्टी वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन देखील करण्यात येत आहे.कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, भीमराव तापकीर, राहूल कुल, सुनिल कांबळे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

भारतीय जैन संघटना संस्थेच्या शांतीलाल मुथा यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या कोविडमुक्त गाव अभियानाची माहिती दिली. हे अभियान प्रत्येक गावात राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button