Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सिंहगड रस्ता होणार वाहतूक कोंडीमुक्त

पुणे :  सिंहगड रस्त्यावर राजारामपूल ते फनटाइम या अडीच किलोमीटरच्या टप्प्यात सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असते. त्यातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. राजाराम पूल परिसरातील श्री विठ्ठल मंदिर ते वडगाव फनटाइम या धायरीकडे जाणाऱ्या दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल मार्चमध्ये खुला केला जाणार आहे.

या पुलाच्या कामासाठी हिंगणे चौकात असलेला शेवटचा गर्डर टाकण्याचे तसेच दोन्ही बाजूंच्या रॅम्पचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तर, ज्या भागाचे काम झाले आहे त्या भागात रेलिंग, डांबरीकरण तसेच पथदिव्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून रस्ता सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा    –      तिरुपती मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी

सिंहगड रस्त्याचे रुंदीकरण तसेच काॅंक्रीटीकरण २००८ मध्ये केंद्र शासनाच्या “जेएनएनयूआरएम’अंतर्गत करण्यात आले. मात्र, त्यानंतर गेल्या दोन दशकांत या भागात सर्वाधिक नागरीकरण झाले. खडकवासला धरणापर्यंत हा भाग विस्तारला आहे. या भागांत जाण्यासाठी सिंहगड रस्ता हा एकमेव मार्ग असून त्याला कोणताही पर्यायी रस्ता नाही. परिणामी, राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत जाण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास वेळ जात होता. तर, जादा कोंडी असल्यास तासभराचा वेळही जात होता. या रस्त्यावर विठ्ठलवाडी, हिंगणे, संतोष हाॅल, माणिकबाग तसेच गंगा भागोदय सोसायटीपर्यंत पाच प्रमुख चौकांत सिग्नल असल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस माेठ्या प्रमाणात जोड रस्ते असल्याने वाहनांच्या सतत रांगा लागत होत्या.

त्यामुळे महापालिकेने हा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यातला राजारामपूल येथे स्वारगेटकडे जाणारा ५०० मीटर पूल लोकसभा निवडणुकीआधी सुरू झाला आहे. तर, आता दुसऱ्या टप्प्यात विठ्ठल मंदिर कमान ते फनटाइम अशा दुहेरी पुलांचे काम सुरू आहे. याचे काम सुमारे ८९ टक्के पूर्ण झाले आहे. येथून वाहतूक सुरू झाल्यास विना अडथळा जाता येणार असून, दररोज सुमारे अडीच वाहनांचा सरासरी २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button