ताज्या घडामोडीपुणे

पुणे शहरातील भाविक बद्रीनाथ यात्रेसाठी गेले, दरड कोसळल्याने अडकले

मदत मिळत नसल्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क

पुणे : पुणे शहरातील एक ग्रुप बद्रीनाथ यात्रेसाठी गेला आहे. परंतु बद्रीनाथमध्ये दरड कोसळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून यात्रेकरु अडकले आहेत. हेमकुंड आणि बद्रीनाथ धाम येथून परतणारे 800 हून अधिक भाविक जोशीमठ गोविंदघाट येथे अडकले असल्याची माहिती आहे. तर 2200 प्रवासी हेलंग, पिपळकोटी, बिर्ही, चमोली आदी थांब्यांवर थांबले होते. पुणे शहरातील गेलेल 52 प्रवासी अडकले आहेत. हे सर्व जण आठ तारखेपासून गोविंद घाटाजवळ अडकून पडले आहेत. परंतु त्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला आहे.

पुणे शहरातील भाविक बद्रीनाथ यात्रेसाठी गेले होते. आठ तारखेला पुण्यातील भाविक बद्रीनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परंतु दरड कोसळल्याच्या घटनेनंतर हे अडकले आहेत. या 52 प्रवाश्यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. यामुळे या प्रवाशांनी मदतीसाठी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला आहे.

असे अडकले भाविक
उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा घटना वाढत आहे. ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर पातालगंगाजवळ भूस्खलन झाले. त्यानंतर हा रस्ता बंद झाला. डोंगर कोसळत असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांचे जीव धोक्यात आले आहे. मंगळवारी जोशीमठजवळ भूस्खलन झाले होते. त्यानंतर बद्रीनाथ धामकडे दर्शनासाठी जाणारे भाविक आणि दर्शन करुन परत येणार भाविक अडकले आहेत.

चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर आणि पातलगंगा भागात भूस्खलन झाले आहे. पातलगंगाकडून रस्ता सुरु झाला आहे. परंतु जोशीमठजवळ भूस्खलन झालेला रस्त्यावरील ढिगारे काढताना अनेक अडचणी येत आहेत. कामगार काम करत असताना पुन्हा भूस्खलन होत आहे. 48 तासांनंतरही हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. या भूस्खलनामुळे बद्रीनाथ, जोशीमठ, नीती, माणा, तपोवन, मलारी, लता ,रैणी, पांडुकेश्वर, हेमकुंड साहिब आदी भागाशी संपर्क तुटला आहे. बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन म्हणजेच BRO रस्ते सुरु करण्याचे प्रयत्न करत आहेत.

उत्तराखंडमधील पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे उत्तराखंडमधील 260 मार्ग बंद आहेत. चारधाम यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अडकलेले भाविक मार्ग सुरु होण्याची प्रतिक्षा करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button