breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल!

पुणे : आपल्या कारनाम्यामुळे चर्चेत आलेल्या खेडकर कुटुंबाच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. एकीकडे यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर दुसरीकडे उच्च न्यायालयानेही पूजा खेडकरला दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला असून तिला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर तिचे वडिल दिलीप खेडकर यांचाहीतपास सुरू आहे. तर कोठडीत असेलेली पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरच्या जामिन अर्जावर आज निकालाची शक्यता आहे.

पुण्यातील मुळशी तालुक्यात स्थानिक शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत धमकवल्या प्रकरणी मनोरमा खेडकरच्या जामिनावर सरकारी पक्ष, मूळ फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज (शुक्रवारी 2 ऑगस्ट) मनोरमा खेडकरच्या जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

सत्र न्यायाधीश अजित मरे यांच्या न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मनोरमा खेडकर प्रकरणात बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा, सरकारी पक्षातर्फे अॅड. कुंडलिक चौरे आणि मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. अमेय बलकवडे यांनी बाजू मांडली. या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष गोळीबार झाला नाही. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचे कलम लागू होत नाही. तिच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. त्यामुळे आर्म अॅक्ट लागू होत नाही. मनोरमा खेडकर नी स्वरक्षणासाठी पिस्तुल वापरते आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा –  Paris Olympics 2024 | कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने जिंकले ऑलिम्पिक मेडल, भारताला तिसरं पदक

वादग्रस्त असलेली मनोरमा खेडकरची मुलगी पूजा खेडकर फरार आहे. तिच्याकडून पुराव्यामध्ये छेडछाड केली जाऊ शकते. त्यामुळे मनोरमा खेडकरचा जामीन फेटाळण्याची मागणी मूळ फिर्यादीचे वकील अॅड. अमेय बलकवडे यांनी केली आहे. याबाबत आज कोणता निर्णय समोर येणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला असून तिला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात आता अजून कोण-कोण गोत्यात येणार याची उत्सुकता आहे. यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकरचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button