Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

MIT Arts, Commerce and Science College, Alandi येथे ‘सायबर जनजागृती दीपोत्सव’

“७५० दिव्यांच्या प्रकाशात ‘Cyber Safe Bharat’चा संदेश; एनएसएस स्वयंसेवकांचा सर्जनशील उपक्रम”

आळंदी, पुणे : National Service Scheme (NSS) विभागामार्फत डिजिटल सुरक्षितता आणि जबाबदार ऑनलाइन वर्तन याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सायबर जनजागृती दीपोत्सव’ हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांनी “Cyber Safe Bharat” या संकल्पनेवर आधारित आकर्षक रांगोळी साकारली. रांगोळीत राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार हेल्पलाईन क्रमांक १९३० तसेच अधिकृत संकेतस्थळ cybersecurity.gov.in यांचा समावेश करण्यात आला. जनजागृतीचा संदेश प्रकाशमान करण्यासाठी रांगोळीभोवती तब्बल ७५० दिवे प्रज्वलित करण्यात आले.

उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे आणि दैनंदिन जीवनात सुरक्षित डिजिटल पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे हा होता. ‘डिजिटलदृष्ट्या सुरक्षित युवा शक्ती ही विकसित भारताच्या उभारणीसाठी अत्यावश्यक आहे,’ हा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील महाजन तसेच प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. मान्यवरांनी स्वयंसेवकांच्या सर्जनशीलतेचे व सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले

हेही वाचा –   खाडीतील युद्धामुळे तेल संकट, अशा कठीण प्रसंगात भारताच्या मदतीसाठी हा देश पहिला धावून आला

लोकगीतांचे सादरीकरण…

कार्यक्रमादरम्यान NSS स्वयंसेवकांनी विविध लोकगीते सादर करून सायबर जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. हा अभिनव उपक्रम NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. अरविंद वागसकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. समारोप प्रसंगी Sant Dnyaneshwar महाराजांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थितांनी सायबर सुरक्षिततेची शपथ घेत डिजिटल सुरक्षिततेचा संदेश दृढ केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button