पश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपुणे

Board Exam GPS Digital Lock Trunk: बारामतीत प्रथमच बोर्ड परीक्षांसाठी जीपीएसयुक्त ‘डिजिटल लॉक ट्रंक’

प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी नवी यंत्रणा : गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांची माहिती

पुणे: इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा अधिक सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळाने बारामतीत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आता प्रायोगिक तत्त्वावर जीपीएस सक्षम डिजिटल लॉक असलेली ट्रंक प्रणाली लागू केली जाणार आहे. ही प्रणाली राज्यात प्रथमच राबविण्यात येत आहे, असे गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांनी सांगितले.

शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे प्रश्नपत्रिका वाहतुकीदरम्यान होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना प्रतिबंध बसणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत अधिक खात्री निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • रिअल-टाइम ट्रॅकिंग: प्रश्नपत्रिका वाहून नेणारे वाहन कुठे आहे, याची माहिती नियंत्रण कक्षाला सतत मिळेल.

  • डिजिटल की प्रणाली: ट्रंक उघडण्यासाठी विशेष डिजिटल कोड किंवा ओटीपी आवश्यक; तो केवळ ठराविक वेळेतच सक्रिय होईल.

  • मार्ग बदलल्यास अलर्ट: वाहनाने निश्चित मार्ग बदलल्यास किंवा ट्रंकशी छेडछाड झाल्यास मुख्य कार्यालयाला तत्काळ सूचना जाईल.

नवी सुरक्षा व्यवस्था:

कस्टोडियनकडून परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पाठवताना त्या विशेष ट्रंकमध्ये ठेवण्यात येतील. ही ट्रंक जीपीएस तंत्रज्ञानाशी संलग्न असून फक्त निश्चित केंद्रावर व ठराविक वेळेत उघडता येईल. अलीकडील काळात पेपरफुटीच्या घटना वाढल्यामुळे शिक्षण मंडळाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह मानला जात आहे. या प्रणालीमुळे बोर्ड परीक्षा निकोप व पारदर्शक पद्धतीने पार पडतील, असे नीलेश गवळी यांनी सांगितले.

“बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी ही नवीन जीपीएसयुक्त डिजिटल लॉक ट्रंक प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे पेपरफुटीला प्रतिबंध बसेल आणि विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेवरील विश्वास वाढेल.”
– नीलेश गवळी, गटशिक्षणाधिकारी, बारातमी. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button