Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एएसएम चेअरमनचा ‘डिजिटल ट्विन’ अवतार; एआय क्रांतीची दमदार सुरुवात

नॅशनल एआय मिशनशी सुसंगत एएसएम एआय फेस्टचा व्यापक प्रारंभ

पुणे  : कृत्रिम बुद्धिमत्ता काळात देशाच्या शिक्षण क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने ९ फेब्रुवारी रोजी ‘एएसएम एआय फेस्ट २०२६’ची भव्य सुरुवात केली. या अनोख्या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी औद्योगिक शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे यांच्या एआय-आधारित ‘डिजिटल ट्विन’ अवताराने दूरस्थ अंतरावर असलेल्या विविध दहा कॅम्पसमध्ये एकाच वेळी बीजभाषण करत उपस्थितांना थक्क केले. डॉ. पाचपांडे प्रत्यक्ष उपस्थित असताना त्यांच्या अत्याधुनिक एआय ‘डिजिटल ट्विन’ने हजारो विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना संबोधित केले. या अनोख्या प्रयोगामुळे एआयच्या युगात शैक्षणिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची नांदी दिली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हा उपक्रम भारत सरकारच्या ‘इंडियन आय मिशन’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी ध्येयांशी सुसंगत आहे. शिक्षणाच्या दैनंदिन प्रक्रियेत, वर्गातील अध्यापनापासून ते प्रशासकीय कामकाजापर्यंत एआयचा समावेश करून एएसएम भारताला जागतिकस्तरावरील कुशल एआय मनुष्यबळ निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या उद्दिष्टाला हातभार लावला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा –  मिळकतकर अभय योजनेबाबत आयुक्तांचा मोठा निर्णय!

‘लर्निंग टुडे, . लिडिंग टुमारो ’ या संकल्पनेवर आधारित एएसएम एआय फेस्ट २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालयात सुरू राहणार आहे. या महोत्सवात सहा हजारांहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असून, प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. शिक्षण, संशोधन, अध्यापन पद्धती आणि संस्थात्मक व्यवस्थापन या सर्वस्तरांवर एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी ही व्यापक कौशल्य चळवळ उभारण्यात आली असल्याचे डॉ. पाचपांडे यांनी सांगितले.

पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन जागतिक दर्जाच्या एआय तज्ज्ञांकडून या सर्व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याने ‘एआय फर्स्ट माईंडसेट’ अंगीकारवा, एआयला प्रतिस्पर्धी नव्हे तर सशक्तीकरणाचे साधन समजून कौशल्य कुशलता प्राप्त करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याने ते म्हणाले.

“एआय माणसांची जागा घेईल, अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. जे एआयचा योग्य वापर करतील, तेच पुढे जातील,” असे प्रतिपादन डॉ. पाचपांडे यांनी केले. “हा महोत्सव आमचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना यशाच्या बाजूला उभे करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व संस्थांमध्ये समारोप सोहळा होणार असून, चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली संचालक, डीन आणि प्राचार्यांनी या भव्य उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. एआय-संलग्न शिक्षण क्षेत्रात एएसएमने अग्रणी भूमिका घेतल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“औद्योगिक शिक्षण मंडळाने गेल्या चार दशकांहून अधिक काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधुनिक बदलांची दखल घेत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण प्रशिक्षण देत उभे केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही एआयच्या वापरातील आव्हाने, कौशल्य विकास आणि माणसांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित संशोधन यावर लक्ष केंद्रित केले आहे. एआय फेस्ट हा दीर्घकालीन उपक्रम आहे. तो इतर अनेक शैक्षणिक संस्थांनाही दिशाआणि प्रेरणा देईल. भारत सरकारच्या एआय धोरणाला सुसंगत असा हा प्रयोग आहे.”

– डॉ. संदीप पाचपांडे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button