Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘माझा आवाज कोणी दाबू शकत नाही’असं फडणवीसांनी म्हणताच अजित पवार यांना हसू आवरेना

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील बाणेर इथे कोव्हिड सेंटरचं उद्घाटन झालं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं होत.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज आवाज असं सांगितलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असं म्हणाले. हे ऐकल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला असलेले अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.

दरम्यान, त्याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजनयुक्त 200 बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

‘माझा आवाज कोणी दाबू शकत नाही’असं फडणवीसांनी म्हणताच अजित पवार यांना हसू आवरेना

फडणवीस म्हणाले, “राज्यात दररोज जवळपास 15 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. संसर्गाचा दर हा 15 टक्के आहे, हे चिंताजनक आहे. आजही आपला मृत्यूदर हा 3.2 टक्के आहे, जो देशापेक्षा जास्त आहे. टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यात टेस्टिंग समाधानकारक असलं तरी मुंबईत टेस्टिंग खूप कमी आहे”.

शेवटच्या वर्षाच्या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला तो योग्य आहे. युवा सेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षा झाली नसती तर भविष्यात या मुलांच्या डिग्रीला कोणतंही महत्व राहिलं नसतं. त्यामुळे या निर्णयाने आमच्या विद्यार्थ्यांचा फायदाच होईल, असं फडणवीस म्हणाले.

त्यानंतर अजित पवारांनीही टोलेबाजी करत “देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही येणार आहेत म्हणून” असं म्हणत पमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या अंदाजात डायलॉग मारला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button