माआेवादी संघटनेशी संबंध? ; चाैघांना न्यायालयीन कोठडी

पुणे – माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या चार जणांना ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्यासमोर आज (गुरुवारी) सुनावणी झाल्यानंतर या चार जणांना ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून सुधीर प्रल्हाद ढवळे (रा. सारनाथ टॉवर बुध्दनगर, गोवंडी, मुंबई), रोना विल्सन (रा. नवी दिल्ली), शोमा सेन (रा. नागपूर) आणि महेश सिताराम राऊत (पिंपळरोड, नागपूर मुळ रा. लाखापूर जि. चंद्रपूर) या चार जणांना अटक करण्यात आली होती. त्या चार जणांना न्यायालयात आणल्यानंतर न्यायाधीस ए. एस. भैसारे यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर चाैघांना ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तर माओवाद्यांच्यावतीने त्यांची प्रकरण हाताळणाऱ्या अॅड. सुरेंद्र गडलिंगला कोर्टाने २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. शाहिद अख्तर, अॅड. सिद्धार्थ पाटील यांनी काम पाहिले.