पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे |महाईन्यूज|
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शहरात सलग दुसऱ्या दिवशी शहरात छापेमारी करून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील एका लॉजमध्ये छापा टाकून पोलिसांनी तीन जणांना अटक करून दोन तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी परिसरात पुणे-बंगळूरु महामार्गावरील एका लॉजवर देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं ‘साई एक्झिक्युटिव्ह’ नामक लॉजवर छापा टाकला.
या वेळी लॉजमध्ये दोन तरुणी, एक महिला आणि दोन पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. जितेंद्र उर्फ जितू बाबासाहेब नंदिरे (वय-32, रा. काळेवाडी), रामकिसन व्यंकट जाधव (वय-35, जनता वसाहत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे, अण्णा माने, अश्विनी केकान, हनुमंत कांबळे, संदीप कोळगे यांच्या पथकानं ही कारवाई केली.