पुणे-लोणावळा लोकल मार्गावर 12 ऑक्टोबरपासून लोकल सेवा होणार सुरू

पुणे | पुण्यातील लोकल रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वेने पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलसेवेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. येत्या 12 ऑक्टोबरपासून पुणे-लोणावळा लोकल मार्गावर लोकलसेवा सुरू केली जाणार असल्याचे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.
कोरोना काळात रेल्वेप्रवास हा बंद आहे. याच कारणामुळे खबरदारी म्हणून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला अनुसरून रेल्वेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. याच कारणामुळे राज्यात लॉकडाऊन आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आले आहे. दरम्यान आणखी काही निर्बंध शिथील करण्यात आले.
यामध्येच राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यासही अनुमती देण्यात आली आहे. आता या नियमांनुसारच पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलसेवा मुंबई महानगर प्रदेशात धावत असलेल्या लोकलसाठी जे नियम आहेत त्या नियमांच्या चौकटीत राहून रेल्वे सेवा सुरू करण्यात येयत आहे.
पुणे विभागात लोकलसेवा पूर्ववत करण्याबाबत समन्वय ठेवण्यासाठी सरकारने पुणे पोलिस आयुक्तांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांची आयुक्तांशी बैठक होऊन त्यात लोकलसेवा सुरू करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. आता येत्या 12 ऑक्टोबरपासून पुणे-लोणावळा मार्गावर लोकल सुरू केली जाणार आहे.
सुरुवातील फक्त दोन ते तीन गाड्या या मार्गावर सुरू असतील. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सुविधा देण्यात येणार आहे.