Breaking-newsपुणे
पुणे – लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत

पुणे – लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21) पूर्ववत होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शुक्रवारी कळविले आहे.
लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीची कामे करायची असल्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, देखभाल- दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा आणि लोणावळा- पुणे मार्गावरील लोकल गाड्या रविवारपासून नियमित धावतील, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. पुण्याहून दुपारी सव्वाबारा आणि एक वाजता सुटणाऱ्या, तसेच लोणावळ्याहून दुपारी दोन आणि पावणेचार वाजता पुण्याकडे येणाऱ्या लोकलचा त्यात समावेश आहे, असे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले आहे.