breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे: पर्वती जलकेंद्र पंपिंग कर एस.एन.डी.टी/चार जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जवेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (२ जून) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (३ जून) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

  • पाणी पुरवठा बंद असणारा भाग पर्वती जलकेंद्र भाग –

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्र्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

  • लष्कर जलकेंद्र पंपिंग भाग –

लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

  • चतु:श्रृंगी / एस.एन.डी.टी/ वारजे जलकेंद्र परीसर –

भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्बेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.

  • नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग-

मुळा रोड, खडकी, एमईएस, हरिगंगा सोसायटी, एचई फॅक्टरी

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button