breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे पोलिस सकाळी 7 वाजल्यापासूनच “ऑन ड्यूटी”

पुणे – रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच पुणे पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मानाचे गणपती आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळापुढे आणि मध्यवर्ती भागात नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीही सकाळपासूनच बंदोबस्तसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गणेशोत्सव होत आहे. पुणे पोलिसांकडून मागील वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे.नेहमीप्रमाणे यावेळीही विसर्जनानिमित्त शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. यावेळीही विसर्जन मिरवणूक असणार नाही. मानाच्या व प्रमुख मंडळांच्या गणपतीचे सकाळी 11 वाजल्यापासूनच मंडपातच विसर्जन होणार आहे. नागरीक दर्शन घेण्यासाठी गर्दी करतील, म्हणून पोलिसांकडून मध्यवर्ती भागात येणारे बहतांश रस्ते सकाळी सात वाजल्यापासूनच बंद करून त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी शहराच्या वेगवेगळ्या भागात बंदोबस्त करीत आहेत.मानाचे गणपती आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळापुढे आणि मध्यवर्ती भागात नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे, बंदोबस्तवरील पोलिसांकडून नागरीकांना मध्यवर्ती भागात जाण्यास मज्जाव केला जात आहे. त्याच बरोबर नदीपात्र, मुठा डावा कालवा, तलाव या ठिकाणी विसर्जन करण्यास मनाई असल्याने तेथेही पोलिसांकडुन नागरीकांना घरी किंवा फिरत्या हौदात विसर्जन करण्यास सांगत आहेत. काही ठिकाणी नागरिक पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सकाळपासुनच गुन्हे शाखेची पथके साध्या वेशात सक्रिय आहेत.

“नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर पडू नये. विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, ” असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी केले आहे.

असा आहे विसर्जनासाठीचा बंदोबस्त

गृहरक्षक दल जवान – 450

दंगल नियंत्रण पथके – 10

राज्य राखीव पोलिस दल – 10 प्लाटुन

बॉम्ब शोधक व नाशक पथके – 08

शीघ्र कृती दल पथके – 16

मुख्यालयाकडून पोलिस ठाण्यासाठीचे मनुष्यबळ – 1100

गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके – 20

पोलिस मुख्यालयातील राखीव तुकड्या – 05

पोलिस ठाण्यांकडील पोलिस मित्र – 1 हजार

वज्र, लिमा, वरूण यांचा राखीव बंदोबस्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button