आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे सर्वात कमी बळी

पुणे | महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर पुण्यात या रोगाने थैमान घातले होते. हळूहळू आता रुग्ण संख्या आटोक्यात येऊ लागली असून मृतांची संख्या घटली आहे. यावर्षी जानेवारी पासून ते आजतागायत म्हणजेच नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्वात कमी मृताची नोंद झाली आहे ती आजपर्यंतच्या मृत्यूत सुमारे एक टक्का आहे.कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेला फेब्रुवारी 2021 मध्ये सुरुवात झाली आणि या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा मृतांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली. पुणे शहरात आजपर्यंत 9088 कोरोन रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत. त्यातील चार हजार 467 रुग्णांचा मागील दहा महिन्यात मृत्यू झाला. यातील सर्वाधिक मृत्यू फेब्रुवारी मार्चनंतर झाल्याचे आकडेवारीतुन स्पष्ट झाले.

ऑक्टोबर महिन्यात म्हणजे 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत सात दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या 17 दिवसातच 8 शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय शहरातील मृत्यूची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाची मृत्यू संख्या कमी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button