TOP Newsताज्या घडामोडीपुणे

महाराष्ट्र केसरीसाठी भुकूममध्ये रंगणार पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भुकूम ग्रामस्थांचे आयोजन, दिग्गजांची उपस्थिती

भुकूम : महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुणे जिल्हा निवड चाचणी भुकूम, ता.मुळशी येथे होणार आहे. त्यामुळे मुळशीकर तसेच भुकूम ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या जिल्हा निवड चाचणीच्या कुस्त्यांचा आखाडा भुकूम येथे शनिवार १० डिसेंबर व रविवार ११ डिसेंबर रोजी रंगणार असल्याची माहिती माजी उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे, सचिन बाळासाहेब हगवणे यांनी दिली. या स्पर्धेचे आयोजन भुकूम ग्रामस्थांनी केले आहे.

        या पुणे जिल्हा निवड स्पर्धेसाठी पुणे-कोलाड हायवे लगत भव्य अशी श्री रामेश्वर क्रीडा नगरी उभारण्यात आली आहे. यामध्ये भव्य पार्किंग तसेच पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी मोठी आसन व्यवस्था केलेली आहे. या कुस्ती स्पर्धेची उत्सुकता व चर्चा पूर्ण जिल्ह्यात सुरू असून अतिशय नियोजनबद्ध कुस्त्यांचे आखाडे रंगणार आहेत. या कुस्ती स्पर्धेसाठी गावातील तरुणांनीच पुढाकार घेऊन ही स्पर्धा तालुक्यात खेचून आणली आहे. कुस्तीच्या इतिहासात पुणे जिल्ह्यात भुकूम गावच्या कुस्त्यांना विशेष महत्त्व असते आहे आणि इथून पुढेही राहणार असे मत माजी उपसरपंच पै.सचिन बाळासाहेब हगवणे यांनी व्यक्त केले.

         या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गज येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, खासदार संजय काकडे, आमदार संग्राम थोपटे, आमदार सचिन अहिर, आमदार विश्वजीत कदम, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार अण्णासाहेब पठारे, माजी आमदार विलास लांडे, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक दीपक मानकर तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर येणार आहेत. यावेळी स्पर्धेच्या ठिकाणी सर्व पैलवान तसेच त्यांच्याबरोबर येणारे प्रशिक्षक यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. 

      स्पर्धेचे आयोजन माजी उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे, सचिन बाळासाहेब हगवणे, उपसरपंच अंकुश प्रकाश खाटपे तसेच ग्रामपंचायत सदस्य निलेश जयसिंगराव ननावरे आणि ग्रामस्थांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button