breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

लोकसंवाद: वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा!

आमदार लांडगे यांच्या मंत्रीपदाची धास्ती : सर्वपक्षीय स्थानिक विरोधक एकवटले

पिंपरी । सुनील आढाव


भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात पहिल्यांदा मंत्रीपद मिळणार असून, त्यामुळे प्रस्थापितांची राजकीय असुरक्षितता वाढली आहे. परिणामी, लांडगे यांना मंत्रीपद मिळू नये, या करिता सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत.


भामा आसखेड प्रकल्पाच्या ‘जॅकवेल’ च्या कामावरुन राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी प्रशासनासह अप्रत्यक्षपणे महेश लांडगे यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. यामागील मूळ कारण, ‘‘पॉलिटिकल इनसिक्युअरीटी’’ असून, लांडगे मंत्री झाले, तर अनेकांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुंग लागणार आहे.


वास्तविक, सुरुवातीच्या काळात नेत्यांच्या सतरंजा उचलण्यापासून २५ वर्षे महेश लांडगे यांनी संघर्ष केला आहे. पहिल्यादा तिकीट मिळण्यासाठी २००२ साली तत्कालीन दिग्गजांचे उंबरे झिजवावे लागले. पहिल्या निवडणुकीत अपयश चाखावे लागले. त्यानंतर पुन्हा पोटनिवडणूक लढवली. २००४ ते २०१४ असे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती असे काम केले. त्यानंतर २०१४ मध्ये सर्व प्रस्थापित पक्षांनी तिकीट नाकारले असताना ‘अपक्ष’ विधानसभा लढवली आणि जिंकली. २०१७ मध्ये भाजपात प्रवेश आणि २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर पुन्हा विधानसभेत धडक दिली. २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला महापालिकेत यश मिळाले. त्यात लांडगे यांचा मोलाचा वाटा आहे. या संघर्षमय प्रवास यशस्वी झाला. कारण, लोकांसाठी त्यांनी वेळ दिला आणि लोकांसाठी काम केले. अन्यथा लांडगे यांना चिरडून टाकण्यासारखी मातब्बर मंडळी शहराच्या राजकारणात होती.


आजच्या घडीला आमदार महेश लांडगे शहराचे ‘‘कारभारी’’ आहेत. असा ‘पालक’ जो स्वत:च्या कर्तुत्वावर आणि हिंमतीवर शहराचे नेतृत्व करीत आहे. बलाढ्य विरोधकांसमोर शहराची आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताची भूमिका मांडत असतो. मग, नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनिकरण असो किंवा भूमिपुत्रांच्या समस्यांना प्राधान्य असो. पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या लढाईल महेश लांडगे कायम अग्रभागी राहिले आहेत.


एखाद्या मंत्र्याला लाजवेल असे कार्य… प्रशस्त कार्यालय, बॅक ऑफीसमध्ये काम करणारी अनुभवी लोकांची यंत्रणा, प्रत्येक प्रकल्प नेटका आणि शहराच्या लौकीकात भर घालणारा… मग, तो छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा असलेला ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ असो किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी आणि कुस्ती संकूल असो… भारतातील सर्वांत मोठी रिव्हर सायक्लोथॉन असो किंवा सर्वांत मोठा ब्रँड बैलगाडा शर्यत असो… आणि भव्य इंद्रायणी थडी.. प्रत्येक उपक्रम ‘ मेगा इव्हेंट’ होतो आणि पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर घालतो. ही कार्यक्षमता असलेला एकही नेता पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्यस्थितीला नाही, हे मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे.


तरुणांची प्रचंड क्रेझ… अबालवृद्धांसाठी ‘इजी टू अवेलेबल’ असलेले आमदार महेश लांडगे नैसर्गिक आपत्तीच्या काळात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही धावून जातात. हा मोठेपणा सहज आलेला नाही. लोकांमध्ये राहुन लोकांसाठी काम करणारा हा नेता पिंपरी-चिंचवड शहराचे ‘भविष्य’ आहे. कारण, एखादा प्रगल्भ नेता तयार व्हायला किमान २० ते २५ वर्षांचा कालावधी लागतो. कै. अण्णासाहेब मगर, शरद पवार, अजित पवार यांच्यानंतर शहराचा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित केला असता. आजच्या घडीला आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हीच नावे समोर येतात. आता जगताप यांची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे शहराचे ‘कारभारी’ एका अर्थाने महेश लांडगे आहेत. परंतु, जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या सोबतीने लांडगे शहराचा आणि भाजपाचा गाडा हाकत आहेत, ही राजकीय प्रगल्भता लक्षात घेतली पाहिजे. अन्यथा ‘‘वाघ एकला राजा..बाकी खेळ माकडांचा’’ अशी जनभावना झाल्याखेरीज राहणार नाही.

महेश लांडगेंमुळेच शहराचा स्वाभीमान टिकला…
महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर २० ते २५ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात गेले. मातब्बर नेत्यांनी राष्ट्रवादीसमोर अक्षरश: गुडघे टेकले, हे संपूर्ण शहराने उघड्या डोळ्यांनी पाहिजे. महाविकास आघाडीसह पक्षांतर्गत विरोधकांचे राजकीय हल्ले होत असताना मात्र महेश लांडगे यांनी स्वाभीमान सोडला नाही. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात लांडगे यांनी एकाकी झुंज दिली. भाजपाची राज्यात सत्ता नसतानाही पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असताना संयम बाळगला. त्याची पोहोचपावती मंत्रीमंडळ विस्तारात मिळेल. पण, लांडगेंचे नेतृत्व मोठे होत आहे म्हणून राजकीय असुयेपोटी आरोप करण्यामुळे पिंपरी-चिंचवडची अपरिमित हानी होणार आहे, ही बाब सर्वपक्षीय नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे.


‘‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’’ चा शहरात ‘खून’
तापट आणि तितकाच भयंकर स्वभाव अशी महेश लांडगे यांची एकेकाळी ओळख. मात्र, सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना राजकारणात सुसंस्कृतपणा असला पाहिजे म्हणून महेश लांडगे यांनी आपल्या व्यक्तीमत्वात प्रचंड बदल केला. ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ ही संकल्पना राबवली. त्याला खरे उतरत आतापर्यंत महेश लांडगे यांनी कुठल्याही नेत्यांवर टिका केलेली ऐकीवात नाही. याला अपवाद असेलही मात्र, निराधार टीका करुन खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न मुळीच केला नाही. हे शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. मात्र, राजकीय असुयेपोटी महेश लांडगे कायम टिकेचे धनी ठरले आहेत. आतापर्यंत केलेला एकही आरोप सिद्ध करता आला नाही, ही विरोधकांची शोकांतिका आहे. यातून वेळीच बोध घेतला पाहिजे. कारण, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे यांना क्षमता असतानाही मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. आता आमदार महेश लांडगे यांचेही नेतृत्व स्थानिक कुरघोड्यांच्या राजकारणात संपवणार आहोत का? याचे आत्मचिंतन स्थानिक नेत्यांची करणे अपेक्षीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button