breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

  • शिक्षण विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांची फिर्याद

पिंपरी / महाईन्यूज

कोविड १९ विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू आहे. अशा काळात महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशव्दारासमोर गर्दी जमवून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करणा-या राजू सुदाम भालेराव आणि इतर पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंड संहिता कलम १८८ व २६९ अन्वये तसेच साथीचे रोग अधिनियम १८९७ अन्वये कलम ३ नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पराग एकनाथ मुंडे, वय ५७ वर्ष रा. दैवत निवास, पुरंदर कॉलनी, काळेवाडी, रहाटणी, पुणे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात समक्ष हजर राहून फिर्याद दिली आहे. या फिर्यादीमध्ये नमुद केल्यानुसार, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणुन नेमणुकीस आहे. माझे कामाची वेळ सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ वाजेपर्यंत आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना १९ विषाणुंचा संसर्ग वाढत असल्याने या विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्याचे संबंधाने उपाययोजना म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने १४/४/२०२१ ते १/५/२०२१ पावेतो संपुर्ण टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषित केला आहे. तसेच मा.पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दि.१४/४/२०२१ रोजी फौजदारी दंड प्रक्रीया संहिता कलम १४४ (१) (३) प्रमाणे १४/४/२०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ते १/५/२०२१ रोजी सकाळी ७ च्या दरम्यान पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीत संचार बंदी आदेश लागु केलेला आहे. आज रोजी मी नेहमी प्रमाणे माझे कामावर आलो. मी माझ्या ऑफीसमध्ये काम करीत असताना दुपारी १२.३० च्या सुमारास उदय जरांडे सुरक्षा अधिकारी यांनी त्यांचा एक सुरक्षा कर्मचारी आम्हाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दार येथे बोलविण्यासाठी माझ्याकडे पाठविला. म्हणुन मी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दार येथे गेलो असता तेथे आमचेकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागितलेला इसम नामे राजु सुदाम भालेराव वय ४५ वर्षे स.जनता फुटवेअर मागे, बलदेवनगर, पिंपरी, पुणे व त्याचे बरोबर ५ इसम तेथे येवुन घोषणाबाजी करीत होते.

तरी सध्या कोरोना १९ संसर्गाची साथ पसरत असताना, तसेच प्रशासनाने लॉकडाऊन जाहिर केले असताना आपले कृत्यामुळे कोरोना संसर्ग पसरुन लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो हे माहित असताना देखील राजु भालेराव याने लोकांना महापालिका मुख्य प्रवेशव्दारासमोर त्याचे बरोबर इतर ५ लोकांना एकत्र जमवून घोषणाबाजी केली. तसेच प्रशासनाचे आदेशाचा अवमान केला म्हणुन राजु भालेराव व त्याचे ५ साथीदार यांचे विरुध्द भा.द.वि. कलम १८८, २६९ प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), साथरोग अधिनियम १८९७ चे कलम ३ प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दिली आहे.

पुढील तपास पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मिलिंद वाघमारे करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button