breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

प्रस्तावित विमानतळ खेड तालुक्यातच व्हायला पाहिजे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे । प्रतिनिधी

बहुप्रतिक्षीत आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात व्हावे यासाठी आपण माझ्याशी पत्रव्यवहार करून मांडलेल्या भूमिकेबद्दल आपले स्वागत करतो. खेड तालुक्यात विमानतळ व्हावे याकरिता मी आपल्या (आमदार महेश लांडगे) पाठीशी खंबीरपणे उभा असून यासाठी लागणारे सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे. हे करत असताना खेडचे प्रस्तावित विमानतळ पुरंदरला का गेले? याबाबतची वस्तुस्थिती समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे, अशी भूमिका शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी खेड तालुक्यात प्रस्तावित विमानतळ व्हावे. याकरिता पाठपुरावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन करणारे पत्र विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाठवले होते.

आमदार लांडगे यांच्या पत्राला आढळराव पाटील यांनी सकारात्मक उत्तर देणारे पत्र पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सन २००५ ते २०१६ या काळात खेड तालुक्यात विमानतळ होणार याची जोरदार चर्चा होती. या काळात खेड तालुक्यात सात जागाचे सव्र्व्हे झाले. यातील कोणतीच जागा तांत्रिक व भौगोलिकदृष्ट्या योग्य नसल्याचा अहवाल भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (Airport Authority of India) व महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ (Maharashtra Airport Development Corporation) या केंद्र व राज्य सरकारच्या विमानतळांबाबतचे घोरण ठरवणाऱ्या शासकीय कंपन्यानी दिला असून, यामागची कारणे नमूद केली आहेत. सदरचे अहवाल पत्रासोबत जोडत आहे. या भागात विमानतळ होण्यास माझा विरोध नव्हता. मात्र विमानतळ होत असताना ज्या शेतकल्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत त्या प्रकल्पग्रस्त शेतकन्यांना विश्वासात घ्या, त्यांना देशोधडीला न लावता प्रकल्पाबद्दल व भूसंपादन प्रक्रियेबद्दल त्यांना समजावून सांगा अशी माझी आग्रही भूमिका होती. मात्र, तत्कालीन सरकारने व प्रशासनाने शेतकऱ्यांना कायम अंधारात ठेवल्यामुळे मला एकटयाला शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे लागले. या भागात विमानतळ होऊच नये यासाठी मी कधीही आदोलन उभारले नाही. मात्र माझ्या शेतकरी हिताच्या भूमिकेचा विरोधकांनी व मिडीयाने चुकीचा अर्थ लावत जाणिवपूर्वक विमानतळास माझा विरोध असल्याचा अपप्रचार केला, असेही आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

  • पक्षभेद, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्य करणार: आढळराव पाटील

तसेच, खेड तालुक्यातले विमानतळ पुरदरला जाण्यामागे नेमकी काय कारणे होती याबाबतचा सविस्तर अहवाल मी सर्वप्रथम सार्वजनिकरित्या लोकांसमोर आणला. खेड तालुक्यातील सेसाठी संपादित केलेल्या जागेमध्ये केवळ एकेरी धावपट्टी असलेले विमानतळ शकते. ही बाब लक्षात घेऊन मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना अनेकदा भेटलो पत्रव्यवहार केला खेड तालुक्यातील चादुम भागात विमानतळ होऊ शकत नसेल तर खेड सेझच्या जागेमध्ये करावे, यासाठी आग्रह धरला. तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला दोन घावया असलेले आंतरराष्ट्रीय दर्जांचे ग्रीन एअरपोर्ट उभारायचे आहे. त्यासाठी सेझमध्ये असणारी जागा अपुरीत्यामुळे आपण पुरंदरला विमानतळ करून पुरंदर एलीव्हेटेड कॉरिडोअर उभारू असे मला सांगितले, अशी खेड विमानतळाबद्दलीची वस्तुस्थिती असून, खेड तालुक्यात विमानतळ व्हावे. यासाठी व्यक्तीश: मी प्रचंड आग्रही आहे. त्यामुळे आपल्या भूमिकेशी मी समरस होवून या विषयी नेहमीच पक्षभेद, राजकीय मतभेद विसरुन वेळोवेळी आवश्यक सहकार्य करेन, अशी ग्वाहीही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार महेश लांडगे यांना दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button