breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांटद्वारे दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती

मुंबई | प्रतिनिधी 
माहुल येथे जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याने माहुल परिसरात भारत पेट्रोलियम कंपनी आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे करण्यात आले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत मुंबई महानगरपालिका सुसज्ज झाली आहे. आजमितीला मुंबईत कार्यान्वित होणारे हे दोन ऑक्सिजन प्लांट म्हणजे कोणत्याही संकटाविरोधात लढण्याच्या मुंबई स्पिरीटचे अनोखे उदाहरण आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग द्यायला हवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

दरम्यान, माहुल चेंबूर येथे पालिकेच्या जागेवर प्लांट उभारण्यात आला आहे. यामध्ये व्हीपीएसए टेक्नॉलॉजीद्वारा ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाचा १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्लांटमध्ये १४ लिटरचा एक याप्रमाणे तासाला सुमारे ५० सिलेंडरची निर्मिती होणार असून दिवसाला सुमारे १५०० सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे. या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पूर्व उपनगर आणि मेट्रो परिसरातील रुग्णालयांना आणि कोविड सेंटरला केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button