breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“हिंदुत्ववादी गंगेत एकटाच स्नान करतो, तर हिंदू…;” राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

नवी दिल्ली |

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अमेठी येथे केंद्र सरकारच्या विरोधात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी असे वक्तव्य करत मोदींवर निशाणा साधला. मोदी यांनी गंगेत डुबकी मारली होती, त्यावरून टीका करत राहुल यांनी मोदींना हिंदूत्ववादी म्हटलं. हिंदुत्ववादी गंगेत एकटाच स्नान करतो, तर हिंदू कोट्यवधी लोकांना सोबत घेऊन जातो, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले, “हिंदू तो आहे जो केवळ सत्याच्या मार्गावर चालतो आणि कधीही त्याच्या भीतीचे हिंसा, द्वेष आणि रागात रूपांतर करत नाही. एक ‘हिंदुत्ववादी’ गंगेत एकटाच स्नान करतो, तर एक हिंदू कोट्यवधी लोकांसह स्नान करतो. नरेंद्र मोदी म्हणतात मी हिंदू आहे, पण त्यांनी सत्याचे रक्षण केव्हा केले? दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, असे ते म्हणाले होते, त्या नोकऱ्या कुठे आहेत?, त्यांनी लोकांना करोनापासून मुक्त होण्यासाठी थाळी वाजवण्यास सांगितले. हे हिंदू आहे की हिंदुत्ववादी?” असा सवाल राहुल गांधींनी केला.

“पंतप्रधान मोदींना सर्वांनी काशीमध्ये गंगेत स्नान करताना पाहिले. तसेच त्यांनी योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह यांना कसे बाहेर हाकलले तेही पाहिले. नरेंद्रजी लहान असताना त्यांनी मगरीशी लढाई केल्याचं सांगितलं होतं. पण गंगेत त्यांना पाण्यात हात मारताना पाहून मला वाटले की त्याला पोहता येत नाही,” असा टोला राहुल गांधींनी लगावला.

“महात्मा गांधी हे खरे हिंदू होते आणि गोडसे हा हिंदुत्वाच्या मार्गाने चालला होता.  हिंदू असणे म्हणजे केवळ सत्याच्या मार्गावर चालणे आणि कोणाचेही भय न बाळगणे. भयाला बळी न पडणे. हिंदू म्हणजे आपल्या भयाचे रूपांतर कधीही हिंसेत न होऊ देणे. महात्मा गांधी हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, असे राहुल यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधी यांना आयुष्यभर सत्याचा अर्थ शोधला. याउलट गोडसे, जो हिंदुत्ववादी होता, त्याला कोणीही महात्मा म्हणत नाही. कारण त्याने अशा एका हिंदूची हत्या केली, जो सत्य बोलायचा. गोडसे हा पळपुटा, दुबळा होता. तो त्याच्या भयावर मात करू शकला नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button