breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रियंका चोप्राच्या बायोपीकमध्ये ‘या’ अभिनेत्रीला करायचीय मुख्य भूमिका

प्रियंका चोप्राच्या बायोपीकमध्ये ‘या’ अभिनेत्रीला करायचीय मुख्य भूमिका

प्रियंका चोप्रा म्हणजे ब्युटी विथ ब्रेन असं बेस्ट कॉम्बिनेशन लाभलेलं जागतिक दर्जाच व्यक्तीमत्त्व. आता अमेरिकन सिंगर निक जोनसची बायको झाली म्हणून तिला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झालं तर तसं मुळीच नाही. लग्नाआधीच तर तिनं काही हॉलीवूड प्रोजेक्टमध्ये काम करून सक्सेस मिळवलं होतं. त्याउपरही ती 2000 सालची ‘मिस.वर्ल्ड’ विनर आहे हे वेगळं सांगायला नकोच. तिनं आपल्या कामानं,कामातील कर्तुत्वानं ते यश प्राप्त केलंय. आणि अशा प्रियंकावर बायोपीक आला तर नवल नव्हे,तो यायलाच हवा. कारण तिनं अगदी कमी वयात काम करीत यशाच्या रस्त्यावर मार्गक्रमण करायला सुरुवात केलीय. त्यामुळे बायोपीकसाठी लागणारं स्ट्रगल,त्यातून मिळणारं यश,अडचणी,गॉसीप्स,तगडे सिनेमे,तिचं लेखनकौशल्य,हॉलीवूड भरारी,तसंच सिनेमांव्यतिरिक्तचं जास्तीचं असं बरंच तिच्या बायोपीक मध्ये दाखवण्यासारखं आहे.

आता अनेक निर्माते-दिग्दर्शक यावर लवकरच विचार करून शिक्कामोर्तब करतील असं म्हणायला हरकत नाही. आता प्रियंकावर बायोपीक येणार मग त्यातील तिची व्यक्तीरेखा साकारणारी थोडी दिसण्यात,कामात तिच्याशी साधर्म्य साधणारी असावी असा निर्मात्या दिग्दर्शकांचा अट्टाहास असणारंच नाही का. तर त्या सगळ्यांना 2021 मध्ये तब्बल 21 वर्षांनी मिस.युनिव्हर्स किताब जिंकून देणारी हरनाज संधूनं एक नकळत सूचना केली आहे . तुम्ही जास्त अभिनेत्री शोधण्याचा त्रास घेऊ नका. मी आहे इथे तयार. हरनाज संधूनं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्याला प्रियंका चोप्राच्या बायोपीकमध्ये काम करायला आवडेल अशी इच्छा बोलून दाखवली आहे.

प्रियंका चोप्रा ‘2000’ साली ‘मिस.वर्ल्ड’ हा किताब जिकंली होती तर हरनाज संधूनं ‘2021’ मध्ये ‘मिस.युनिव्हर्स’ हा किताब जिंकला तेव्हाचे क्षण कैद केलेले हे दोन छायाचित्र आहेत.

हरनाज संधू जेव्हा ‘मिस.युनिव्हर्स’ किताब जिंकली होती तेव्हा तिनं आपण प्रियंकाचे फॅन आहोत,तिला फॉलो करते ब-याच बाबतीत,तिनं तिचं करिअर ज्या प्रकारे घडवलंय त्याचा मला अभिमान आहे असंही सांगितलं होतं. आता पहायचं की कोणता निर्माता-दिग्दर्शक हरनाज संधूची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार होतोय. अर्थात ही इच्छा व्यक्त करून तिनं अनेक निर्मात्या-दिग्दर्शकांना मोठा विषयच दिला आहे सिनेमा बनवण्यासाठी,नाही का?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button