breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

एज्युकेश वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंगमध्ये प्रियदर्शनी स्कूल ‘तंत्रज्ञाना’त पुणे जिल्ह्यात प्रथम

  • राज्यात द्वितीय तर भारतात सहावा क्रमांक पटकाविला

पिंपरी । प्रतिनिधी
एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग २०२१ – २०२२ मध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या सर्व्हेक्षणात इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी स्कूलला सन्मानित करण्यात आले. तंत्रज्ञान एकत्रीकरण शाळा वर्गवारीत पुण्यात प्रथम, महाराष्ट्रात द्वितीय तर भारतात सहाव्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. याच बरोबर CO.Ed School २०२१-२०२२ या वर्गवारीअंतर्गत शाळेने पुण्यात पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले.

मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार शाळेचे अध्यक्ष राजेंद्र सिंग, पूजा सिंग यांनी स्वीकारला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव, अर्पिता दीक्षित यांनी स्वीकारला.याबाबत शाळेचे अध्यक्ष राजेंद्र सिंग म्हणाले की, प्रियदर्शनी स्कूल पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण परिसरातील नावाजलेली शिक्षण संस्था आहे. ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९८२ मध्ये इंद्रमण सहदेव सिंग यांनी केवळ पाच विद्यार्थ्यासह केली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, विकासासाठी आवश्यक ते सर्व अद्ययावत ज्ञान समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मिळावे व सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे, हा त्यामागील उद्देश होता.ही संस्था गेली ३९ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात ज्ञानदानाचे अविरत काम करीत आहेत. शाळेमधून शिक्षण घेतेलले सुमारे नऊ हजार विद्यार्थी जगभरात उच्च पातळीवर काम करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button