breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला महिन्याला 29 कोटी डोस देणार”

सातारा – महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा चौथा टप्पा सध्या सुरू झाला आहे. यात राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केलं आहे. पण सध्या सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

पुढील 6 महिने राज्यासाठी महत्वाचे आहेत. देशभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जनतेने लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतातील दोन आणि विदेशी काही लसींचे उत्पादन वाढवून 29 कोटी डोस प्रति महिना महाराष्ट्राला उपलब्ध होणार आहेत, अशी महिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परंतू अद्याप राज्य सरकारकडून याबद्दल सांगण्यात आलं नाही.

केंद्राकडून राज्याला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन आणि 1750 टन ऑक्सिजन दिलं, याचा पुनरूच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विरोधकांनी कितीही कोंडी केली तरी त्यांचे जनतेसाठी सकारात्मक काम सुरुच आहे. कोरोना काळातील त्यांच्या रुग्णसेवेला ईश्वराचे पाठबळ आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मयाणी मेडिकल कॉलेजात 500 बेडचे हॉस्पिटल आज सुरु आहे. त्याठिकाणी 3500 पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करुन कोरोना विरूध्दची लढाई समर्थपणे लढत आहे. तर म्हसवडच्या कोरोना उपचार केंद्रात 100 बेड्सच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button